Kokanchi Mansa Sadhi Bholi lyrics, कोकणची माणसं साधी भोळी the song is sung by Rohit Raut from Saregama Marathi. Kokanchi Mansa Sadhi Bholi Love soundtrack was composed by Padmanabh Gaikwad with lyrics written by Hrishikesh Vidar.
कोकणची माणसं साधी भोळी Lyrics in Marathi
अरे नाखवा हो नाखवा
गोमू माहेरला जाते
गोमू माहेरला जाते हो नाखवा
हिच्या घोवाला कोकण दाखवा
गोमू माहेरला जाते हो नाखवा
हिच्या घोवाला कोकण दाखवा
वाडीतली बाग देखणी गो कोकणी नारळी पोफळी चव खरी
गणराया नांदतो इथे या कोकणी नाचतो दशावतारातुनी
कोकण जणु उन्हाळी सुट्टीचा
जोडीला आंबापोळीचा
दावा कोकणची निळी निळी खाडी
दावा कोकणची निळी निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी
दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी
भगवा अबोली फुलांचा ताटवा
हिच्या घोवाला कोकण दाखवा
गोमू माहेरला जाते हो नाखवा
हिच्या घोवाला कोकण दाखवा
bharatlyrics.com
गणपतीपुळ्याची शांतता गो कोकणी जायला यायला लाल परी
काजुची उसळ नि सोलकढी कोकणी आणते स्वर्ग ताटामंदी
कोकण ह्यो वेंगुर्ला मालवणचा
जणु दरिया ह्यो मायेचा
कोकणची माणसं साधीभोळी
कोकणची माणसं साधीभोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
त्यांच्या भरली शहाळी
त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा
हिच्या घोवाला कोकण दाखवा
गोमू माहेरला जाते हो नाखवा
हिच्या घोवाला कोकण दाखवा